मुळव्याध हा एक सामान्य रोग असून जो अनियमित जीवनशैली, आहारातील बिघाड, आणि इतर अनेक कारणांमुळे उद्भवू शकतो. मूळव्याध मुख्यतः गुदद्वारात होणाऱ्या रक्तवाहिन्या (व्हेन्स) च्या सूजमुळे होतो. ग्रेड 3 मूळव्याध म्हणजे मूळव्याधाच्या तीन स्तरांपैकी तिसरा स्तर, ज्यात लक्षणे आणि परिणाम अधिक गंभीर असतात. आज आपण ग्रेड 3 मुळव्याध म्हणजे काय,ग्रेड 3 मुळव्याध होण्याची कारणे,ग्रेड 3 मुळव्याध होण्याची लक्षणे तसेच ग्रेड 3 मुळव्याध होऊ नये म्हणून कोणती खबरदारी घ्यावी तसेच मुळव्याधावर काय उपाय करावेत याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत…
Must Read – महिलांना या कारणांमुळे होतो मूळव्याधाचा त्रास
ग्रेड 3 मूळव्याध म्हणजे काय ?
- ग्रेड 3 मूळव्याध हा सर्वात गंभीर टप्प्यामधील मुळव्याध नाही पण या अवस्थेमध्ये मुळव्याध गुदद्वारातून पुढे सरकला जातो. या प्रकारच्या मुळव्याधामध्ये सुद्धा उपचारांची आवश्यकता नक्कीच असते कारण ग्रेड 3 मूळव्याध हा ग्रेड 4 मुळव्याधामध्ये विकसित होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.
- ग्रेड 3 मूळव्याध या मुळव्याधाच्या टप्प्यामध्ये रक्तस्राव सुरू होऊ शकतो. त्यासोबतच आतड्यासंबंधी हालचाल करत असताना जळजळ, खाज येणे तसेच अतिरिक्त वेदना जाणवणे यांसारखी काही लक्षणे जाणवू शकतात.
ग्रेड 3 मूळव्याधाची लक्षणे :
- ग्रेड 3 प्रकारच्या मूळव्याधात गुदद्वारातून थोड्या प्रमाणात रक्त येणे, हे लक्षण जाणवू शकते.
- गुदद्वाराजवळ तीव्र वेदना, विशेषतः शौचास जाताना तीव्र वेदना जाणवू शकतात हे ग्रेड 3 प्रकारच्या मूळव्याधाचे लक्षण आहे.
- गुदद्वारात बाहेर आलेले किंवा फुगलेल्या गुठळ्या आतील किंवा बाहेरील बाजूने जाणवू शकतात.
- गुदद्वाराच्या आसपासच्या भागांमध्ये खाज सुटू शकते.
- गुदद्वाराभोवती सूज जाणवू शकते.
ग्रेड 3 मूळव्याध होण्याची कारणे :
- ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला ग्रेड 1 किंवा ग्रेड 2 प्रकारचा मुळव्याध उद्भवतो आणि त्यावेळी ती व्यक्ती व्यवस्थित रित्या उपचार करत नाही त्यावेळी ग्रेड 3 प्रकारचा मुळव्याध होऊ शकतो.
- ओटी पोटावर गर्भधारणे दरम्यान दबाव वाढल्यास मुळव्याध विकसित होऊ शकतो.
- ज्या व्यक्तींना बद्धकोष्ठतेचा त्रास असतो त्यावेळी आतड्यासंबंधीत हालचाल करत असताना ताण येऊन गुदाशय क्षेत्रामधील नसांवर दबाव जाणवू शकतो आणि त्यामुळे मूळव्याध विकसित होऊ शकतो.
- अतिसाराचा वारंवार होणारा त्रास यामुळे सुद्धा मुळव्याध विकसित होऊन ग्रेड 3 मुळव्याधामध्ये परिवर्तित होऊ शकते.
- ज्या व्यक्तींचे वजन अतिशय जास्त आहे किंवा ज्या व्यक्तींना लठ्ठपणा आहे त्या व्यक्तींच्या गुदाशय नसांवर जास्त दबाव पडू शकतो आणि त्यामुळे मुळव्याध होण्याची शक्यता वाढू शकते.
- दीर्घकाळ उभे राहणे किंवा दीर्घकाळ बसणे या कारणांमुळे सुद्धा गुदाशय क्षेत्रातील नसांवर दबाव येऊ शकतो आणि त्यामुळे मुळव्याध विकसित होऊ शकतो.
- काही व्यक्तींमध्ये मुळव्याध विकसित होण्याचे कारण त्यांची अनुवंशिक पूर्वस्थिती सुद्धा असू शकते.
- वयोमानानुसार गुदाशय क्षेत्रामधील नसांना ज्या उती आधार देतात त्या कमकुवत होऊन मूळव्याध होण्याचा धोका वाढतो.
- अवजड वस्तू उचलत असताना गुदाशयाच्या भागात दाब वाढू शकतो आणि त्यामुळे मूळव्याध विकसित होऊ शकतो.
- आहारामध्ये फायबरची कमतरता असल्यामुळे सुद्धा शौचाच्या समस्या जाणवू शकतात आणि त्यामुळे मुळव्याध होऊ शकतो.
- ज्या व्यक्तींचे बसून काम असते किंवा शरीराची जास्त हालचाल होत नाही अशा व्यक्तींमध्ये व्यायाम न केल्यामुळे रक्तवाहिन्या कमजोर होऊन मूळव्याध होण्याची शक्यता उद्भवू शकते.
ग्रेड 3 मुळव्याधावर उपचार :
- औषधे: वेदना कमी करण्यासाठी आणि सूज कमी करण्यासाठी विविध औषधे उपलब्ध आहेत, डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ती औषधे घ्यावीत.
- आहारामध्ये सुधारणा: अधिक फायबरयुक्त आहार घेणे आवश्यक आहे. ताजी फळे, भाज्या, दही किंवा ताक, स्प्राउट्स आणि संपूर्ण धान्यांचा समावेश आपण आहारामध्ये करावा तसेच मुळव्याधासाठी जो आहार घातक आहे त्या प्रकारचा आहार घेणे टाळावे.
- नियमित व्यायाम करावा : नियमित व्यायाम केल्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि मूळव्याधाच्या समस्यांपासून बचाव होतो.
- सर्जरी: मुळव्याधाची अत्यंत गंभीर परिस्थिती असल्यास सर्जरीची आवश्यकता भासू शकते.
- 5. शस्त्रक्रिया: रबर बँड लिगेशन,स्टेपलर हेमोरायडेक्टॉमी,लेझर शस्त्रक्रिया या प्रकारच्या शस्त्रक्रिया मुळव्याधाची परिस्थिती लक्षात घेता केल्या जातात.
- घरगुती उपचार ,आयुर्वेदिक उपचार : मुळव्याधावर काही घरगुती उपचार तसेच आयुर्वेदिक उपचार पद्धती सुद्धा उपलब्ध असतात परंतु त्या उपायाबद्दल खात्रीशीर माहिती असल्यावरच तसे उपाय करणे योग्य ठरेल.
मुळव्याध (पायल्स) असलेल्या व्यक्तींनी खालील प्रकारचा आहार घेणे टाळावे:
- तिखट आणि मसालेदार पदार्थ: तिखट आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे आतड्यातील जलद हालचाल वाढू शकते.
- फास्ट फूड: फास्ट फूड हे पचवायला कठीण असतात आणि पोटाच्या समस्यांना कारणीभूत होऊ शकतात.
- अल्कोहोल: अल्कोहोल सेवन केल्यामुळे शरीरातील द्रवपदार्थ कमी होऊ शकतात.
- साखरेचे पदार्थ: साखरेचे पदार्थ हे शरीरात दाह वाढवू शकतात.
- कॅफिनयुक्त पेय: कॅफिनयुक्त पेय घेणे सुद्धा टाळावे.
मुळव्याध टाळण्यासाठी उपाय –
- नियमितपणे व्यायाम करावा.
- आहारात फायबरची योग्य ती मात्रा घ्यावी.
- शरीरासाठी आवश्यक असे पुरेसे पाणी प्यावे.
- शौचाला नियमितपणे योग्य वेळी जावे.
ग्रेड 3 मूळव्याध एक गंभीर समस्या आहे जी योग्य उपचार न केल्यास गंभीर परिणाम करू शकते. त्यामुळे, लक्षणे जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. योग्य आहार, नियमित व्यायाम आणि तज्ञांचा सल्ला घेतल्यास मूळव्याधाची समस्या कमी करता येऊ शकते. म्हणूनच जर तुम्हाला मुळव्याधाची काही लक्षणे जाणवत असतील तर तुम्ही डॉ. अभिजित गोतखिंडे [ Piles Specialist in hadapsar, Pune ]यांच्याशी संपर्क साधू शकता.
To Book An Appointment Contact at this Number – +918801510151