पित्ताक्षय म्हणजे काय?(What is gallstones)
पित्ताशयाच्या(Gall Bladder) समस्या उद्भावन्याची कारणं, मानवाच्या शरीरात पित्तरसाची निर्मिती ही यकृतात (Liver) होत असते. यकृताच्या(Liver) खालच्या बाजूला फुग्याच्या आकाराची पिशवी असते तिलाच पित्ताशय (gall bladder) असे म्हणतात. पित्ताशय (gall blader) हा जीवनाला अथवा आरोग्याला अत्यावश्यक असा अवयव नसला तरी महत्त्वाचा आहे. याचे काम हे तयार झालेले पित्त(bile) साठवून ठेवणे व प्रत्येक जेवणाच्या वेळी ते पित्तनलिकेवाटे लहान आतड्यात(Small intestine) सोडणे असते. झालेल्या अन्नाच्या पचनासाठी याची गरज असते. जेवणानंतर ठराविक प्रमाणामध्ये हा पित्तरस लहान आतड्यात सोडला जातो. हल्लीच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनात सगळचं फास्ट झालं आहे. मग फास्ट फूड तरी मागे कसं राहील? त्यामुळे पित्ताशय संबंधी समस्या सुरू होतात .यात पित्ताशयात खडे होणे हे खूप कॉमन आहे. यालाच Gall Bladder Stone असे म्हणतात. हे खडे मटारच्या दाण्यांएवढे किंवा त्यापेक्षाही अधिक मोठे असू शकतात.
चला.. या समस्येची कारणे जाणून घेऊयात.
पित्ताशयाच्या समस्या ची कारणे (Causes of gallbladder problems)
- आहारात तेलकट पदार्थांचे प्रमाण जास्त झाले वा फायबर पदार्थांचे प्रमाण कमी झाले तर पित्तरसाची घनता वाढते व पित्ताशयात छोटे छोटे खडे तयार होतात.
- जेव्हा पित्तात अधिक प्रमाणात कॉलेस्ट्रॉल तयार होते तेव्हा ते पित्ताशयात खडे निर्माण करते.
- स्थूल व्यक्तींना ( पुरुषांपेक्षा स्त्रियांना हा त्रास होण्याचे प्रमाण सहापट आहे) याचा धोका आधिक आहे.
- अती तेलकट आणि मसालेदार खाणे आहारात तंतुमय पदार्थांचे सेवन न करणे, बैठी कामे करणे, व्यायामाचा अभाव असणे या गोष्टींमुळे पित्ताशयात खडे होऊ शकतात.
- वरचेवर फास्ट फूड किंवा जंक फूड खाणे, शरीराची हालचाल हालचाल कमी करणे या गोष्टी सुद्धा याला कारणीभूत आहेत.
- २० % पित्त खडे(Gall stone) हे कॅल्शियम सॉल्ट आणि बीलिरुबिन पासून बनतात.
जास्तीत जास्त पित्त खडे(Gall Bladder Stone) कोणतेही लक्षण किंवा नुकसान न पोहोचवता पित्ताशयात(Gall Bladder) पडेलेले असतात. कधी सोनोग्राफी केली तरच याचे निदान होते.पण लक्षणे दिसली तर लगेचच उपचार करावे लागतात.
पित्ताशयाच्या समस्या ची काही लक्षणे(Symptoms of gallbladder problems):
- पोटात अधून मधून उजव्या बाजूला दुखणे.
- ही वेदना एक किंवा दोन तासांपेक्षा अधिक काळ टिकत नाही.
- मळमळ, गडद रंगाची लघवी, मातीच्या रंगाचा मल, पोटात बर्पिंग, अतिसार, आंबट ढेकर ही काही पित्ताशयात खडे(Gall bladder stone) झाल्याची लक्षणे आहेत.
पित्ताशयाच्या समस्या ची जोखीम घटक (Risk factors for gallbladder problems):
पित्ताशयात खडे झाल्यामुळे निर्माण होणाऱ्या काही जोखीम खालील आहेत.
- पोटात खूप जोरात वेदना होऊ शकतात
- पित्ताशयात इन्फेक्शन होऊ शकते.
- यावर उपचार न केल्यास हे जीवास धोकादायक ठरू शकतं.
- पित्त खड्यांमुळे कावीळ देखील होऊ शकते तसेच स्वादुपिंडदाह ही होऊ शकतो.
त्यामुळे पित्ताशयाची काळजी घेणे गरजेचे आहे. आहारात तेलकट मसालेदार जेवण कमी घेणे , नियमित व्यायाम करणे हे पित्ताशय निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असते.
Ultra Care Clinic
Dr. Abhijit Gotkhinde हे शस्त्रक्रियेनंतरही हर्नियावर उत्तम उपचार देतात. शस्त्रक्रियेनंतरच्या वेदनांवर बरा होण्यासाठी तो सर्वोत्तम घरगुती उपाय सुचवतो. तुम्हाला अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेनंतरच्या वेदना होत असल्यास,
संपर्क करा : Ultra Care Clinic, Dr. Abhijit Gotkhinde, Pune.